Schaeffler India : शाफलर इंडिया (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३७९१)

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल १८४९ कोटी रुपये आहे; तसेच कंपनीचा निव्वळ नफा २२८ कोटी रुपयांवर पोहचला आहे.
Schaeffler India
Schaeffler India Sakal

शाफलर इंडिया कंपनीची स्थापना १९६२ मध्ये झाली. ही कंपनी हायप्रिसिजन रोलर, बॉल बेअरिंग्ज, इंजिन सिस्टीम, ट्रान्समिशन घटक, चासिस ॲप्लिकेशन, क्लच सिस्टीम आणि संबंधित मशिन बिल्डिंग उत्पादन क्रियाकलापांचा विकास, उत्पादन आणि वितरणामध्ये गुंतलेली आहे.

कंपनीचा ऑटोमोटिव्ह विभाग प्रवासी कार, व्यावसायिक वाहने; तसेच ट्रॅक्टरसाठी तांत्रिक उपाय विकसित आणि उत्पादन करण्यात अग्रणी आहे. कंपनीचा इंडस्ट्रिअल सेगमेंट हा बेअरिंग सोल्युशनचा पोर्टफोलिओ प्रदान करतो. कंपनीचे उत्पादन प्रकल्प गुजरातमधील वडोदरानजीक सावली येथे तसेच; महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे (पुणे) येथे; त्याचप्रमाणे तमिळनाडूमधील होसूर येथे आहेत.

किफायतशीर उत्पादन; तसेच संशोधन आणि विकासक्षमता कंपनीला निर्यातीचा व्यवसाय वाढविण्याची एक मजबूत संधी प्रदान करत आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ योजना अशा सरकारी उपक्रमांचा कंपनीला लाभ होऊ शकतो. तांत्रिक कौशल्यामुळे कंपनीला सतत नव्या ऑर्डर मिळत आहेत. ऑटोमोटिव्ह विभागात ‘डबल क्लच सिस्टीम’ आणि ‘हेवी ड्यूटी क्लच’साठी; तसेच औद्योगिक विभागात, कंपनीला रेल्वे विभागासाठी सतत नव्या ऑर्डर मिळत आहेत.

तेजीचे संकेत मिळण्याची शक्यता

जाहीर झालेल्या निकालानुसार, गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल १८४९ कोटी रुपये आहे; तसेच कंपनीचा निव्वळ नफा २२८ कोटी रुपयांवर पोहचला आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेवून धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर दरवर्षी सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, ही कंपनी प्रगती करत आहे.

सप्टेंबर २०२२ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. आगामी काळात ४०२० रुपये या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास मध्यम अवधीच्या आलेखानुसारदेखील तेजीचे संकेत मिळू शकतील. शेअर बाजारातील चढ-उतार आणि कंपनीच्या कार्यक्षेत्रातील जोखीम लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com