
SEBI Ban Arshad Warsi: शेअर बाजारातील हेराफेरीच्या एका गंभीर प्रकरणात, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि इतर 57 संस्थांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. दोघांनाही शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सेबीने 12% वार्षिक व्याजासह 58.01 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.