SEBI: शेअर बाजारातील अफवा थांबवण्यासाठी सेबीने जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

Share Market: सेबीने 21 मे रोजी शेअर बाजारातील अफवांचा सामना करण्यासाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार, अज्ञात बातमी किंवा अफवेमुळे शेअरमध्ये मोठा बदल झाला असेल तर कंपनीला 24 तासांच्या आत त्या बातमीची पुष्टी करावी लागेल.
Sebi Guidelines to Tackle Market Rumours
Sebi Guidelines to Tackle Market Rumours Sakal
Updated on

Sebi Guidelines to Tackle Market Rumours: सेबीने 21 मे रोजी शेअर बाजारातील अफवांचा सामना करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार, अज्ञात बातमी किंवा अफवेमुळे शेअरमध्ये मोठा बदल झाला असेल तर कंपनीला 24 तासांच्या आत त्या बातमीची पुष्टी करावी लागेल. कंपनीला त्या बातमीवर आपले स्पष्टीकरण द्यावे लागेल. मार्गदर्शक तत्त्वे 1 जूनपासून पहिल्या 100 सूचीबद्ध कंपन्यांना लागू होतील आणि डिसेंबर 2024 पर्यंत पुढील 150 कंपन्यांना लागू होतील.

सेबीला अफवांमुळे नुकसान थांबवायचे आहे

असे बर्‍याच वेळा झाले आहे की एखाद्या व्यासपीठावर, कंपनीशी संबंधित अशी बातमी येते ज्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये चढ -उतार होत असल्याचे दिसून येते. नंतर कंपन्या ती बातमी फेटाळून लावतात.

Sebi Guidelines to Tackle Market Rumours
Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी सांगितले नफा कमावण्याचे सूत्र; म्हणाले, 'पैसा ही सर्वात...'

अनेक वेळा कंपन्या बातम्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अधिक वेळ घालवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. हे थांबविण्यासाठी सेबीने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

सेबीच्या नव्या नियमानुसार, स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांसाठी हे बदल आवश्यक आहेत. शेअर बाजारातील कोणत्याही अफवांमुळे स्टॉकच्या किमतींमध्ये काही बदल झाल्यास, या बाजारातील अफवांची 24 तासांच्या आत पडताळणी करणे आवश्यक आहे.

Sebi Guidelines to Tackle Market Rumours
SBI Chairman Interview: SBI चेअरमन पदाची मुलाखत अचानक रद्द, काय आहे प्रकरण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.