
Retail Traders Faced Losses: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण शेअर बाजार नियामक SEBI ने सोमवारी जाहीर केलेल्या एका स्टडीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. वित्तीय वर्ष 2025 मध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज (Equity Derivatives Segment - EDS) मध्ये ट्रेड करणाऱ्या जवळपास 91% सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावं लागलं आहे.