
थोडक्यात:
आज शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात झाली, सेन्सेक्स घसरला तर निफ्टीत थोडी वाढ झाली.
ऑटो, मीडिया, रिअल्टी क्षेत्रात तेजी, तर IT सेक्टरमध्ये सुरुवातीला घसरण झाली.
टेस्ला भारतात आपल्या शोरूमसह प्रवेश करत असून गुंतवणूकदारांचं लक्ष HDFC Life, ICICI Lombard यांच्या निकालांवर आहे.
Stock Market Opening Today: आज शेअर बाजाराने संमिश्र सुरुवात केली. सेन्सेक्स घसरणीसह आणि निफ्टी किरकोळ वाढीसह उघडला. सकाळी सेन्सेक्स 20 अंकांनी घसरून 82,233 वर उघडला, तर निफ्टीत 7 अंकांची वाढ होऊन 25,089 वर उघडला. बँकिंग क्षेत्रात मात्र सुरुवातीला दबाव दिसून आला. बँक निफ्टी 56 अंकांनी घसरून 56,709 या पातळीवर उघडला. चलन बाजारातही सौम्य हालचाल झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 85.99 वरून थोडा मजबूत होत 85.97 वर उघडला.