
Stock Market Closing Today: संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान आज देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून आली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरले आणि लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्समध्ये 200 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली आहे.
तर निफ्टीमध्येही घसरण होऊन तो 22,450 च्या जवळ बंद झाला आहे. आजच्या व्यवहारात निफ्टीवरील बँक, ऑटो, फायनान्शिअल, मेटल, आयटी, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक लाल रंगात बंद झाले. तर एफएमसीजी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला.