
डॉ. वीरेंद्र ताटके
ये त्या गुरुवारी (ता. १०) गुरुपौर्णिमेचा सोहळा सर्वत्र साजरा केला जाईल. गुरू म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नसून ज्ञान देणारे एखादे तत्त्व, प्रसंग किंवा एखादी संस्थादेखील असू शकते. आधुनिक जगात जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान देणारा शेअर बाजारदेखील एका अर्थाने गुरू आहे, असे म्हणता येईल. शेअर बाजार फक्त फायदा कमवायचे ठिकाण नाही, तर आयुष्यभरासाठी उपयोगी पडणाऱ्या पुढील गोष्टी येथे शिकायला मिळतात.