Share Market Closing Bell : हिरव्या निशाणावर बंद झाला शेअर बाजार, सेन्सेक्स ६६,७९५ अंकांवर स्थिरावला

आज निफ्टी ३८ अंकांच्या तेजीसह १९,७४९ अंकांवर स्थिरावला आहे.
Share Market Closing Bell
Share Market Closing BelleSakal
Updated on

भारतीय शेअर मार्केटसाठी आजचा दिवस अगदीच ऐतिहासिक ठरला. दुपारी सेन्सेक्सने ६७ हजारांचा आकडा पार केला होता. मात्र, दुपारनंतर विक्रीचा जोर वाढल्यामुळे २०५ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स ६६,७९५ अंकांवर स्थिरावला. तर दुसरीकडे निफ्टी देखील ३८ अंकांच्या तेजीसह १९,७४९ अंकांवर स्थिरावला आहे.

आजच्या व्यवहारांमध्ये आयटी, एनर्जी, ऑईळ अँड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. तर बँकिंग, ऑटो, फार्मा, मीडिया, रिअल इस्टेट, मेटल्स या सेक्टरमध्ये मंदी दिसून आली. आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉक्स लाल निशाणावर बंद झाले.

Share Market Closing Bell
Multibagger Stocks Update: 28 हजारांत गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १५ ग्रीन तर १५ रेड मार्कवर बंद झाले. तर, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २० शेअर्समध्ये तेजी दिसून आली, आणि ३० शेअर्स रेड मार्कवर बंद झाले. (Share Market Closing Bell)

आज इन्फोसिस, एशियन पेंट्स (१.५१ टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.०७ टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.९३ टेक), आयसीआयसीआय बँक (०.६६ टक्के), विप्रो (०.४३ टक्के) आणि महिंद्रा अँड महिंद्रा (०.३५ टक्के) हे टॉप गेनर राहिले. तर एसबीआय, बजाज फायनान्स, टायटन, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स या कंपन्यांमध्ये मंदी दिसून आली.

Share Market Closing Bell
Multibagger Stock Updates: 7 वर्षात गुंतववणूकदार झाले कोट्यधीश, कोणता आहे 'हा' शेअर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.