Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणते शेअर्स करतील मालामाल? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: अनिश्चित जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या जोखीम घेत नाहीत
Share Market Today
Share Market TodaySakal

Share Market Investment Tips: गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात झाली, मात्र दमदार सुरुवात करणारे इंडेक्स दिवसाखेरीस लाल रंगात बंद झाले. निफ्टी 19400 च्या खाली घसरला.

दिवसाअखेर सेन्सेक्स 180.96 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 65252.34 वर आणि निफ्टी 57.30 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी घसरून 19386.70 वर बंद झाला. गुरुवारी सुमारे 1725 शेअर्स वधारले तर 1768 शेअर्स घसरले.

अनिश्चित जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाहीत. दरम्यान आता भारतीय शेअर बाजारची नजर जागतिकही संकेतांवर अवलंबून असू शकते.

निफ्टीने टेक्निकल चार्टवर मंदीचा कॅंडलस्टिक तयार केल्याचं पाहायला मिळतोय. 19470 वर निफ्टीचा रेझिस्टंटन्स असल्याने जोवर बाजार याखाली आहे तोवर मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळू शकते.

Share Market Today
Medical Inflation: वैद्यकीय उपचारांचा खर्च 5 वर्षात झाला दुप्पट, महागाईत दरवर्षी 14% दराने वाढ

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांच्यामते गुरुवारी सुरुवातीच्या सौद्यांमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. बाजार अस्थिर पाहायला मिळाला. अनिश्चित जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या जोखीम टाळत असल्याचे ते म्हणाले.

बाजाराचं लक्ष सध्या जागतिक संकेतांवर असेल. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने मंदीचा कॅन्डलस्टिक तयार केला आहे, जो सध्या बाजारातील कमजोरी दर्शवतोय. 19470 ची लेव्हल लागेचची रेझिस्टंस लेव्हल आहे.

निफ्टी याच्या खालीच राहिल्यास बाजाराचा माहोल कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान अशा परिस्थितीत निफ्टी आणखी खाली म्हणजे 19325-19300 च्या दिशेने घसरू शकतो. तर दुसरीकडे निफ्टीने 19500 ची लेव्हल पार केल्यास पुढे 19600-19625 या लेव्हल पर्यंत तेजी पाहायला मिळू शकते.

Share Market Today
Letter of Intent : इच्छापत्र का व कसे आवश्यक

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JIOFIN)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • डीव्हीस लॅब (DIVISLAB)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

  • हिंद पेट्रो (HINDPETRO)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • एयू बँक (AUBANK)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com