Share Market : 'या' शेअरची कमाल, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एका वर्षात तब्बल 10 पटीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' शेअरची कमाल, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एका वर्षात तब्बल 10 पटीने वाढ

Share Market Investment Tips : टेलरमेड रिन्यूएबल्सचे (Taylormade Renewables) शेअर्स गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवा रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. शुक्रवारीही या शेअर्समे अप्पर सर्कीट गाठले.

टेलरमेड रिन्यूएबल्स ही रिन्यूएबल एनर्जी सॉल्यूशन देणारी कंपनी आहे, जिची मार्केट कॅर केवळ 118.83 कोटी आहे. त्यांचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत.

2023 वर्षाची सुरूवात झाली तेव्हा टेलरमेड रिन्युएबल्सचे शेअर्स बीएसईवर केवळ 36.35 रुपयांवर ट्रेड करत होते, जे आता 120.95 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच फक्त 2 महिन्यात या शेअरची किंमत सुमारे 232.74% वाढली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 2023 रोजी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 1 लाख रुपयांची किंमत आज 232.74% ने वाढून 3.32 लाख झाली असती.

गेल्या 12 महिन्यांत, टेलरमेड रिन्युएबल्सचे शेअर्स सुमारे 918.10% वाढले आहेत. तर, डेली अपर-सर्किटमुळे, त्याच्या शेअर्सची किंमत मागच्या अगदी काही दिवसांत सुमारे 21 टक्क्यांनी वाढली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टेलरमेड रिन्युएबल्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर त्याची किंमत 918.10% ने वाढून 10.18 लाख रुपये झाली असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.