
Share Market Opening : किंचित तेजीसह शेअर बाजार उघडला; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये...
Share Market Opening 29 March 2023 : भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसह उघडला. चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
RIL आणि अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसत आहे. याआधी मंगळवारी मोठ्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात दबाव होता. सरतेशेवटी, सेन्सेक्स 40 अंकांनी घसरून 57,613 वर बंद झाला आणि निफ्टीही 34 अंकांनी घसरून 16,951 वर बंद झाला.
सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सने 57800 चा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय निफ्टीनेही बाजार उघडताच 17000 च्या वरची पातळी दाखवली आहे. (Share Market Opening latest updates today 29 march 2023 bse nse sensex nifty)
BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 41.64 अंकांच्या घसरणीसह 57,572.08 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, निफ्टीचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 25.60 अंक किंवा 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 16,977.30 वर उघडण्यात यशस्वी झाला.

BSE India
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. NSE निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये वाढ दिसत आहे. याशिवाय 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आजच्या व्यवसायात, सर्व क्षेत्रीय निर्देशांक NSE च्या निफ्टीमध्ये वाढ दाखवत आहेत. तेल आणि गॅस शेअर्समध्ये घसरण होत आहे. बँक, मेटल, ऑटो, फार्मा, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी शेअर्समध्ये तेजीची नोंद आहे.
आज ऑटो आणि एफएमसीजी सोबतच रिअॅल्टी आणि पीएसयू बँक शेअर्स चांगल्या तेजीसह व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये तेजी :
M&M, HUL, Tata Motors, HCL Tech, Bajaj Finserv, HDFC Bank, UltraTech Cement, Bharti Airtel, HDFC, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, सन फार्मा, नेस्ले हे सेन्सेक्सचे टॉप 24 शेअर्स आहेत जे तेजीने व्यवहार करत आहेत.