
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्याने जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसला, ज्यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने तेजीचा प्रवास कायम ठेवला. सेन्सेक्स 415.21 अंकांनी वाढून 83,108.92 वर पोहोचला, तर निफ्टी 110.8 अंकांनी वधारून 25,441.05 वर उघडला. मागील सत्रात सेन्सेक्स 82,693.71 आणि निफ्टी 25,330.25 वर बंद झाले होते.