लक्ष ‘टाटा स्टील’कडे...

गुंतवणूकदारांनो, शेअर बाजाराकडे लक्ष आहे का? गेल्या आठवड्याच्या अखेरीस ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली
share market stock analysis tata steel investment
share market stock analysis tata steel investmentSakal

गुंतवणूकदारांनो, शेअर बाजाराकडे लक्ष आहे का? गेल्या आठवड्याच्या अखेरीस ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली. या बाजाराचा विचार करताना, टाटा समूहातील कंपन्याकडे नजर टाकायला हवी.

टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टायटन, टाटा केमिकल्स, टाटा कन्सल्टन्सी, ट्रेंट, व्होल्टाज, टाटा कन्झ्युमर, टाटा एलेक्सी, जॅग्वार-लँड रोव्हर, एअर इंडिया, टाटा कम्युनिकेशन, टाटा कॅपिटल, क्रोमा,

टाटा प्ले अशा अनेक टाटा कुलोत्पन्न कंपन्या भारताला भरभराटीस आणत आहेत. ‘टाटा सन्स’च्या अधिपत्याखाली आणि एन. चंद्रशेखरन् यांच्या देखरेखीखाली सर्वच कंपन्या प्रगती करत आहेत. या कंपन्यांपैकी सर्वांत जुनी कंपनी असलेल्या ‘टाटा स्टील’बद्दल आपण विचार करणार आहोत.

टाटा स्टीलबद्दल आताच जास्त माहिती करून घेण्याची कारणे-

टाटा समूहातील पुढील काही कंपन्या ‘टाटा स्टील’मध्ये सामावून घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे- इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस्, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टाटा मेटॅलिक्स, टीआरएफ, टिनप्लेट कंपनी (१० टिनप्लेट शेअरना ३३ टाटा स्टील शेअर. रेकॉर्ड तारीख १९ जानेवारी), टाटा स्टील मायनिंग (डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण).

या कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे अनेक फायदे होऊ शकतात. त्याचा परिणाम टाटा स्टीलच्या प्रगतीत दिसू शकतो.

टाटा स्टील लि. बाजारभाव

  • (१२ जानेवारी २०२४) ः रू. १३५.३०

  • उच्चांकी भाव : रू. १५३.४५

  • नीचांकी भाव : रू. ३.७१

  • शेअरची मूळ किंमत : रू. १

परतावा...

  • ६ महिने : १७.९६%

  • १ वर्ष : १४.५६%

  • ३ वर्षे : ९४.७०%

  • ५ वर्षे : १८५.३२%

  • सीएजीआर ३ वर्षे

  • विक्री : २७.८१%

  • नफा : १७८.८९%

  • भांडवल : रू. १२२१ कोटी

  • प्रवर्तक हिस्सा : ३३.९%

  • गंगाजळी : रू. १,०१,८६० कोटी

  • आरओसीई : १२.५८%

  • शेवटचा बोनस : जून २००४

  • प्रमाण : १:२

शेअरमधील संभाव्य वाढ

जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात (ता. २५) टाटा स्टील कंपनीच्या शेअरधारकांची सभा होऊन वर उल्लेख केलेल्या काही कंपन्या टाटा स्टीलमध्ये सामावून घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आजमितीला रु. १३५ च्या आसपास असलेला शेअरभाव बराच वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही ब्रोकरच्या मते, अल्पकाळात तो रू. १६० च्या पुढे जाऊ शकेल, अशी आशा आहे. मुळातच कमी किमतीचा (रु. १३५) शेअर असल्यामुळे भरपूर शेअर घेऊन मोठा नफा मिळविण्याची संधी आहे, असे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com