Share Market | बाजाराच्या घसरणीच्या काळातही हा शेअर देतोय दमदार परतावा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : बाजाराच्या घसरणीच्या काळातही हा शेअर देतोय दमदार परतावा...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अतिशय अस्थिर वातावरण आहे. पण या घसरत्या बाजारातही, एक स्मॉल कॅप स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. हा शेअर मधुसूदन सिक्युरिटीजचा (Madhusudan Securities) आहे.

ही एनबीएफसी क्षेत्रातील कंपनी असून तिचे मार्केट कॅपिटल फक्त 9.11 कोटी आहे. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मधुसूदन सिक्युरिटीज हा मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 190% आणि गेल्या एका वर्षात 163% इतका दमदार परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 दिवसांत त्याचा स्टॉक 15.16% वाढला आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने मधुसूदन सिक्युरिटीजच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 190% ने वाढून 2.90 लाख झाले असते.

दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 163% ने वाढून 2.63 लाख झाले असते.

अशात तुमच्याकडे मधुसूदन सिक्युरिटीजचे शेअर्स असतील तर ते होल्ड करण्याचा सल्ला शेअर मार्केट एक्स्पर्ट्स देत आहेत. कारण येत्या काळात हे शेअर्स आणखी दमदार परतावा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market