
Share Market : झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी, जाणून घेऊयात कारणे...
मुंबई : झी एंटरटेनमेंटच्या गुंतवणूकदारांना मंगळवारचा दिवस लाभदायक ठरला. कारण मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची वाढ झाली आहे. इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 197.80 रुपयांवर पोहोचले.
दुपारी 12 वाजता झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 6.29 टक्क्यांनी वाढून 194.35 रुपयांवर व्यवहार करत होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) कंपनीवरील सर्व्हिलंस काढून टाकल्याचा हा परिणाम आहे.
एनएसईने मे पासून नवीन डेरिव्हेटिव्ह करार जारी केले आहेत. कंपनीकडे आधीपासूनच मार्च आणि एप्रिलचे एक्सपायरी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
गेल्या 6 दिवसांपासून झी एंटरटेनमेंटचे शेअर्स सतत लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 18.56 टक्क्यांनी घसरले आहेत.
स्टॉक एक्स्चेंजने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते की ते फेब्रुवारीच्या एक्सपायरीसाठी फ्युचर्स-ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण झाल्यानंतर नवीन करार जारी करणार नाहीत. यासोबतच डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्ससाठी आता 100 टक्के मार्जिन आवश्यक असल्याचे एक्स्चेंजने म्हटले आहे.
या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली. यानंतर, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने झी एंटरटेनमेंटच्या विरोधात इंडसइंड बँकेची याचिका स्वीकारली, ज्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढल्या.
पण 23 फेब्रुवारीला झी एंटरटेनमेंटने नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलच्या (NCLAT)Tच्या निर्णयाला स्थगिती दिली. यानंतर एनएसईनेही आपला निर्णय बदलला, त्यामुळे कंपनीचे शेअर्समध्ये आता रिकव्हरी होताना दिसत आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.