Stock Analysis : या सरकारी कंपनीचे शेअर्स रॉकेट, 14,000 कोटीच्या ऑर्डरचा परिणाम...

SJVN Limited latest news |एसजेवीएन लिमिटेडचे (SJVN Limited) शेअर्स आतापर्यंत त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी अतिशय लाभदायक ठरले आहेत. शुक्रवारीही या शेअर्समध्ये तब्बल 14% ने वाढ झाली.
SJVN Limited
SJVN LimitedSakal
Updated on

एसजेवीएन लिमिटेडचे (SJVN Limited) शेअर्स आतापर्यंत त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी अतिशय लाभदायक ठरले आहेत. शुक्रवारीही या शेअर्समध्ये तब्बल 14% ने वाढ झाली. भारत सरकारच्या मालकीच्या या कंपनीने एक दिवसापूर्वी सांगितले होते की त्यांना मिझोराम सरकारकडून 14,000 कोटीची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

यानंतर त्याच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ईशान्येकडील कोणत्याही राज्यात कंपनीला मिळालेली ही पहिली ऑर्डर आहे. कंपनीना मिझोरम सरकारकडून दार्जो लुई पंप स्टोरेज प्रोजेक्टच्या वाटपासाठी लेलेटर ऑफ इंटेंट मिळाल्याचे कंपनीने सांगितले.

2,400 मेगावॅट क्षमतेचा हा प्रोजेक्ट तुइपुई नदीची उपनदी दार्जो नालावर बांधला जाणार आहे. निधी खर्चासह प्रोजेक्टची अंदाजे किंमत 13,947.5 कोटी आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 153.64 रुपयांवर व्यवहार करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 65% वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 165 टक्के परतावा दिला आहे.

मिझोरम सरकारच्या या प्रोजेक्टमध्ये प्रत्येकी 300 मेगावॅटचे एकूण आठ युनिट्स असतील आणि प्लांटच्या 95% उपलब्धतेसह वार्षिक 49.93 लाख युनिट्सचे ऊर्जा उत्पादन असेल. 72 महिन्यांच्या कालावधीत हा प्लांट पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

SJVN पुढील 3 महिन्यांत मिझोराम सरकारसोबत या करारावर स्वाक्षरी करेल. याशिवाय, कंपनी IREDA च्या सहकार्याने नेपाळमध्ये 900 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात मदत करेल. या सर्व प्रोजेक्ट्सना केंद्र सरकार आणि संबंधित नियामकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

जून तिमाहीपर्यंत बीएसई लिस्टेट कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) एसजेवीएन लिमिटेडमधील आपला हिस्सा 2.26% पर्यंत वाढवला आहे.

मार्च तिमाहीत SJVN मध्ये 1.73% हिस्सा होता. लहान भागधारकांनीही जूनच्या तिमाहीत कंपनीतील त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे. मार्च तिमाहीच्या अखेरीस कंपनीच्या लहान भागधारकांची संख्या 11.6 लाख होती, जी जून तिमाहीत वाढून 12.3 लाख झाली. 2 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या भागधारकांना लहान भागधारक म्हणतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com