
शेअर बाजारात आज सेन्सेक्स व निफ्टीने दमदार तेजी दाखवली.
टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, मेटल व ऑटो शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत व कच्च्या तेलातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 418 अंकांनी वधारून 81,018 वर बंद झाला, तर निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,596 वर स्थिरावला. बँक निफ्टी मात्र थोडासा घसरला. तो 60 अंकांनी खाली येऊन 55,557 वर बंद झाला. दुसरीकडे, रुपया 43 पैशांनी घसरुन 87.66 रुपये प्रति डॉलरवर पोहोचला.