Stock Market Closing : भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; सेन्सेक्स 319 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today : मीडिया वगळता इतर सर्व सेक्टोरल निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात व्यवहार केला. BSE Midcap निर्देशांक 0.6% ने वाढला, तर Smallcap निर्देशांक 0.3% ने खाली आला.
Share Market Closing

Share Market Closing

Sakal 

Updated on

Indian Stock Market Today : सलग तीन दिवसांच्या तोट्यानंतर भारतीय शेअर बाजारात आज (सोमवारी) तेजी दिसली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आशियाई बाजारातील वाढीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या रंगात व्यवहार करत बंद झाले.

सेन्सेक्स 319 अंकांनी वाढून  83,535.34 वर बंद झाला, तर निफ्टी 82 अंकांच्या वाढीसह  25,574.35 वर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com