Stock Market Crash: Sensex Falls 1,000 Points as IT Stocks Tumble 5%
eSakal
Share Market
Stock Market Crash: शेअर बाजारावर ट्रम्प वादळ! सेन्सेक्स 1,000 अंकांनी कोसळला तर IT सेक्टर 5% घसरले; नेमकं कारण काय?
Sensex and Nifty Crash Today: आज सकाळी झालेल्या घसरणीनंतर पुढच्या तीन तासांत भारतीय शेअर बाजार कोसळला असून निफ्टी निर्देशांक 286 अंकांनी खाली आला तर सेन्सेक्स तब्बल 1,000 अंकांनी घसरला आहे.
Indian Share Market Crash: काल झालेल्या वाढीनंतर आज दुपारी12.30 वाजेपर्यंत भारतीय शेअर बाजार कोसळला असून सेन्सेक्स निर्देशांक तब्बल 1,000 अंकांनी खाली आला आहे. बाजारातील आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये झालेल्या तीव्र विक्रीमुळे दबाव वाढला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ₹2.94 लाख कोटींचे नुकसान झाले असून बीएसईचे एकूण मार्केट कॅप सुमारे ₹466 लाख कोटींवर आले.

