Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा; कारणं काय? पुन्हा तेजी येणार?

Why Is the Stock Market Falling Today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला. जाणून घ्या सेन्सेक्स-निफ्टी पडण्यामागची 4 कारणं आणि बाजाराच्या पुढील वाटचालीबाबत काय संकेत आहेत.
Stock Market Crash: Sensex Falls 1,200 Points From High, ₹10 Lakh Crore Market Value Wiped Out

Stock Market Crash: Sensex Falls 1,200 Points From High, ₹10 Lakh Crore Market Value Wiped Out

eSakal

Updated on: 

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारपर्यंत सेन्सेक्स 700 अंकांहून अधिक घसरून 72,600 च्या खाली व्यवहार करत होता तर दिवसाच्या उच्चांकाच्या तुलनेत त्यात 1,200 अंकांहून अधिक घसरण झाली. दुसरीकडे, निफ्टी 50 मध्ये 250 अंकांहून अधिक घसरण होऊन तो 22,400 च्या खाली आला. या घसरणीमुळे BSE वर लिस्ट असणाऱ्या कंपन्यांच्या एकूण मार्केट वॅल्यू म्हणजेच बाजारमूल्यात जवळपास 10 लाख कोटी रुपये कमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com