

Stock Market Crash: Sensex Tanks 1500 Points in Minutes After Trump’s Warning
eSakal
Share Market Crash: पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात आलेल्या घसरणीचा परिणाम आज सकाळीच भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजार कोसळला. बाजार उघडताच 1 मिनिटात सेन्सेक्स तब्बल 1,500 अंकांनी खाली आला. जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ यामुळे बाजारात सध्या अस्थिरता कायम असून गुंतवणूकदार सावध भूमिका घेताना दिसत असल्याचे दिसत आहे.