Share Market
Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!
Sensex and Nifty : PSU बँकांचे शेअर्स विलीनीकरणाशी संबंधित बातम्या आणि मजबूत होत असलेल्या आर्थिक स्थितीमुळे वाढले. तर अमेरीकन फेडने दरकपात करण्याची शक्यता वर्तविल्याने आज IT कंपन्यांना फायदा झाला.
Indian Stock Market Closing : भारतीय शेअर बाजार सकाळच्या छोट्या घसरणीची मजबूत भरपाई करत हिरव्या रंगात बंद झाला. परदेशी गुंतवणूक वाढत असल्याने आणि IT सेक्टरचे शेअर वाढल्याने दिवसभर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
सेन्सेक्स तब्बल 513 अंकांनी वाढून 85,186 वर, तर निफ्टी 57 अंकांच्या वाढीसह 26,052 वर बंद झाला. निफ्टीने आज पुन्हा 26,000 चा टप्पा पार केला.

