
अमेरिकेच्या ट्रंप प्रशासनाने भारतावर टॅरिफ दुप्पट केल्याने शेअर बाजारात घसरण झाली.
सेन्सेक्स 240 अंकांनी घसरला, निफ्टी 24,550 च्या खाली गेला.
आगामी काही दिवस शेअर बाजारासाठी निर्णायक ठरू शकतात.
Stock Market Opening Today: भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावर नाराजी व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) दुप्पट करत 25 टक्क्यांवरून थेट 50 टक्के केलं आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.