
Stock Market Opening Today: शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आज पुन्हा बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 94 अंकांनी घसरून 81,457 वर उघडला. निफ्टी 6 अंकांनी वाढून 24,832 वर उघडला.
बँक निफ्टी 24 अंकांनी घसरुन 55,328 वर उघडला. आज क्षेत्रीय निर्देशांकात बरीच वाढ दिसून आली. एफएमसीजी निर्देशांक वगळता, जवळजवळ सर्व निर्देशांकांमध्ये हिरवळ दिसून आली. एफएमसीजी निर्देशांक आज 1 टक्क्यांहून अधिक घसरला.