
Stock Market Opening Today: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात फारशी तेजी दिसून आली नाही. प्री-ओपनिंगमध्ये बाजार सपाट राहिल्यानंतर, नियमित व्यवहाराच्या सुरुवातीलाही थोडी घसरण झाली. आज (8 जुलै 2025) सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 55 अंकांनी घसरून 83,387 वर व्यवहार करत होता. निफ्टी देखील 34 अंकांच्या घसरणीसह 25,427 वर उघडला, तर बँक निफ्टी 7 अंकांनी घसरून 56,942 वर व्यवहार करत होता.