
थोडक्यात:
निफ्टी 150 अंकांनी घसरून 25,000 खाली बंद झाला, तर सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला.
अॅक्सिस बँकेच्या निराशाजनक निकालांसह FIIs विक्रीमुळे शेअर्सवर दबाव वाढला.
तांत्रिक घटक आणि जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात नकारात्मक कल कायम आहे.
Stock Market Closing Today: आज शुक्रवारचा (18 जुलै) दिवस देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. संपूर्ण आठवड्यात बाजार घसरलेला होता, पण नंतर बाजारातील घसरण वाढली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.
निफ्टी 150 अंकांनी घसरून 25,000 च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 81,800च्या जवळ बंद झाला. बँक निफ्टी 600 अंकांनी घसरून 56,250च्या जवळ बंद झाला.