
Stock Market Today: भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1349 अंकांनी वाढून 80,803 वर उघडला. निफ्टी 412 अंकांनी वाढून 24,420 वर उघडला. बँक निफ्टी 1063 अंकांनी वाढून 54,658 वर उघडला. आज सर्वात मोठी तेजी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दिसून आली.