
Stock Market Opening Today: शेअर बाजार तेजीसह उघडला. आज सकाळी निफ्टी 70 अंकांच्या वाढीसह 22541 वर उघडला. ऑर्डर मिळाल्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढला. याशिवाय पॉवर ग्रिड, ओएनजीसी, टाटा स्टील या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. M&M म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स सारखे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.