

Stock Market Closing Today: मंगळवारी (18 फेब्रुवारी) जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाला. देशांतर्गत कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे कमकुवत निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्रीमुळे बाजारात घसरण झाली आहे. तसेच, ब्रॉडर मार्केटमधील स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने बाजाराची चिंता आणखी वाढवली आहे.