

Stock Market Today
Sakal
Indian Share Market Today: काल झालेल्या तेजीनंतर आज मात्र भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. आज सकाळच्या सत्रात सुरुवातीला बँकिंग शेअर्सवरील दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरणीसह उघडले. मात्र आशियाई बाजारातील तेजी आणि ब्रेंट क्रूडच्या किमतीत झालेली घट यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला असल्याने बाजारात पुन्हा वाढ दिसून येत आहे.