

Stock Market Today: Top Gainers Shine! Why Are Big IPOs Getting Delayed?
eSakal
Indian Share Market Big IPO Update: भारतीय शेअर बाजारात दिवसभरात मोठे चढ-उतार झाले असले तरी प्रमुख निर्देशांकांनी दिवसाच्या अखेरीस हिरव्या रंगात बंद होत सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम ठेवली. आज रुपयाच्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याने बाजाराला आधार मिळाला. तसेच होर्मूज सामुद्रधुनीतून पुन्हा वाहतूक सुरू होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक व्यापारातील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात खरेदीला चालना मिळाली