

Stock Market Today: Sensex Falls 320 Points, Nifty at 25,250 — Top Losers List
eSakal
Indian Stock Market Today : बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात किंचित घसरणीसह झाली. मागील सत्रातील जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले होते, त्याचाच दबाव आजही कायम राहिला. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली निधीची सततची विक्री, कंपन्यांचे संमिश्र आर्थिक निकाल यामुळे बाजारातील भावना दबावाखाली राहिली.