

Stock Market Today: Sensex Crashes 500 Points at Open; Why Markets Are Falling Today
eSakal
Share Market Today: मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजार एकदम कोसळला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे अलीकडे जागतिक बाजारात झालेल्या घसरणीनंतर काल शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली होती मात्र आज पुन्हा बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने गुंतवणूकदारांची सावध भूमिका यातून दिसून येत आहे.
आज सकाळच्या व्यवहारात 9:20 वाजता निफ्टी निर्देशांक 166 अंकांनी घसरून 24,596 वर व्यवहार करत होता. तर BSE सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 565 अंकांनी घसरून 79,450 वर व्यवहार करत होता.