
Stock Market Closing Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. बाजाराची सुरुवात शांत झाली आणि नंतर निर्देशांकही वर गेले, पण त्यानंतर बाजारात घसरण झाली.
निफ्टी 113 अंकांनी घसरला आणि 23,092 वर बंद झाला. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरून 76,190 वर बंद झाला आणि बँक निफ्टी 221 अंकांनी घसरून 48,367 वर बंद झाला.