

Stock Market Today: Sensex Falls 1,000 Points Amid US-Iran War Fears
eSakal
US-Iran War Impact on Share Market : अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे सोमवारी मार्च महिन्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तांमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आणि गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिणामी शेअर बाजार कोसळला.