

Stock Market Crash: Sensex Plunges 1500 Points! What Triggered the Fall?
eSakal
Sensex and Nifty 50 Today: आज नवीन आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली. मागच्या आठवड्यात युद्ध थांबल्यानंतर बाजारात चांगली तेजी दिसून आली. मात्र आज सकाळीच निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक कोसळले.
अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेला यश न मिळाल्यानंतर युद्ध अधिक काळ सुरू राहण्याची भीती वाढली आहे. त्यातच अमेरिकन नौदल इराणी बंदरांमधून होणाऱ्या जहाजवाहतुकीवर निर्बंध आणण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे तेलाच्या किंमती अचानक वाढल्या आणि त्याचा परिणाम होऊन बाजार कोसळला.