

Stock Market Crashes Ahead of RBI Decision!
eSakal
Sensex and Nifty Today: आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगत झाली. पश्चिम आशियात सुरू असलेले अमेरिका-इराण युद्धाबाबत अनिश्चितता आणि उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीचा निर्णय जाहीर होणार असल्याने बाजारात गुंतवणूकदारांकडून सावध भूमिका दिसली. परिणामी सकाळीच बाजार उघडल्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली.