

Stock Market Today: Sensex, Nifty End Higher; IDFC First Bank and TCS Decline
eSakal
Indian Share Market Today: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवली. पीएसयू बँक आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे आज बाजाराला आधार मिळाला. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफ धोरणाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळाले आणि देशांतर्गत बाजाराला पाठबळ मिळाले.