

Stock Market Today: Sensex-Nifty Fall; IT Stocks Under Pressure, ICICI & Hindustan Zinc in Focus
eSakal
Indian Stock Market Today : मंगळवारी लाल रंगात बंद झाल्यानंतर आजही शेअर बाजार घसरणीसह उघडला. भारताचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी व्यवहाराच्या सुरुवातीलाच घसरणीसह उघडले. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या मजबूत किमती यामुळे आज बाजारावर दबाव दिसून आला. मात्र, कंपन्यांच्या स्थिर नफावाढीने बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.