Stock Market Today: व्हाइट हाऊसच्या अहवालाने शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; LIC-Reliance मध्ये जोरदार हालचाल

Share Market Today: जागतिक संकेत, भू-राजकीय चर्चांमधील सकारात्मक बदल आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यामुळे आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला दिसत आहे.
Stock Market Today: Sensex Jumps 500 Points After White House Report, LIC & Reliance in Spotlight

Stock Market Today: Sensex Jumps 500 Points After White House Report, LIC & Reliance in Spotlight

eSakal

Updated on

Sensex and Nifty 50 Today: आज जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शांत होण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. अमेरिकन व्हाइट हाऊसच्या अहवालानुसार इराणसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होऊन जागतिक बाजारात ऊर्जा पुरवठ्यातील अडथळे दूर होण्याची आशा वाढली आहे आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com