Sensex, Nifty in Red Amid Geopolitical Tensions; Gold Rallies, Reliance Industries Shines
Sakal
Indian Stock Market Today : नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. बाजारातील मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मध्यम घसरणीसह व्यवहार करत होते. बाजारात शेअर कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल गुंतवणूकदारांना उत्साह देत होते, मात्र व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे वाढलेल्या जागतिक तणावाबाबत गुंतवणूकदार सावध होताना दिसले. त्यामुळे शेअर बाजारात आज सकाळी घसरण बघायला मिळाली.