Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

Vedanta Demerger: गुरुवारी भारतीय शेअर बाजारात Vedanta Limited कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 62% घसरण दिसून आली. मात्र ही घसरण म्हणजे गुंतवणूकदारांचे नुकसान नसून Demerger प्रक्रियेचा परिणाम आहे.
Vedanta Shares Crash

Vedanta Shares Crash 62% in a Day! Real Loss or Demerger Effect

eSakal

Updated on

Vedanta Demerger: भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख आणि मोठी कंपनी असलेल्या Vedanta Limited कंपनीचे शेअर्स आज गुरुवारी एकदम कोसळले. NSE सेन्सेक्स वर शेअर तब्बल 62.58% नी घसरून ₹289.50 वर आला, तर काल हा शेअर ₹773.60 वर बंद झाला होता. मात्र शेअर मध्ये झालेली ही मोठी घसरण पाहून घाबरण्याचं कारण नाही, कारण हा बदल कंपनीच्या विभाजन (Demerger) प्रक्रियेचा तांत्रिक परिणाम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com