
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार सुस्त; सेंसेक्स 300 अंकांपर्यंत खाली आला तर निफ्टी 25,000 च्या खाली सरकला.
ग्लोबल मार्केट्समध्ये दबाव कायम; डाओ-नॅस्डॅक लाल रंगात, पण भारताचा सर्व्हिस PMI 65.6 च्या रेकॉर्ड पातळीवर.
DIIs ने सलग 33व्या दिवशी खरेदी केली; कॉर्पोरेट मोर्चावर विप्रो-हार्मन डील आणि अपोलो हॉस्पिटल्स ब्लॉक डील चर्चेत.
Stock Market Opening Today: आज आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीला सेंसेक्स 49 अंकांनी घसरून 81,951 वर उघडला, तर निफ्टी 19 अंकांनी घसरून 25,064 वर सुरु झाला. बँक निफ्टीदेखील 199 अंकांनी घसरून 55,556 वर उघडला.
यानंतर बाजारातील घसरण वाढली. सेंसेक्स जवळपास 300 अंकांनी खाली आला, निफ्टीही 90 अंकांनी घसरून 25,000 च्या खाली गेला. NBFC, मेटल, रिअल्टी आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये सर्वाधिक दबाव दिसला, तर मीडिया, फार्मा आणि कंझ्युमर ड्यूरेबल्समध्ये हलकी वाढ झाली.