
Stock Market Closing Today: भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढल्यामुळे, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी (9 मे) भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 24 हजारांच्या पातळीवर बंद झाला तर बीएसई सेन्सेक्स 79,500 च्या खाली बंद झाला.