
अमेरिकेच्या टॅरिफ धमकीनंतरही भारतीय शेअर बाजार सावरला आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्हींमध्ये वाढ झाली.
टेक महिंद्रासारखे आयटी शेअर्स तेजीत राहिले, तर मिड-स्मॉलकॅपमध्येही खरेदी दिसली.
भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या आशेने बाजारातील घसरण थांबली आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
Stock Market Closing Today Update: शेअर बाजारावर टॅरिफचं नवीन संकट समोर आलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. रशियाकडून स्वस्त दरात खरेदी होणाऱ्या तेलामुळे चिडलेल्या ट्रम्प प्रशासनाने भारतावर लावण्यात आलेले टॅरिफ 25 टक्क्यांवरून थेट 50 टक्क्यांवर नेले आहे.