
Stock Market Closing Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात उत्साह दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार वाढीसह बंद झाले. मिडकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले, आयटी, फार्मा आणि बँकिंग शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. मेटल आणि एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 582.95 अंकांनी किंवा 0.72 टक्क्यांनी वाढून 81,790.12 वर बंद झाला. निफ्टी 183.40 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी वाढून 25,077.65 वर बंद झाला.