
शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठी घसरण झाली; सेंसेक्स 400 तर निफ्टी 100 अंकांनी खाली.
अदानी पोर्ट्स, रिलायन्स, इन्फोसिससारखे दिग्गज शेअर्स रेड झोनमध्ये ट्रेड करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धमकीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता वाढली.
Stock Market Fall: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या व्यापारदिवशी, म्हणजे मंगळवारी सकाळच्या सत्रातच नकारात्मक सुरुवात झाली आणि त्यानंतर निर्देशांक घसरतच गेला. मुंबई शेअर बाजाराचा (BSE Sensex) प्रमुख निर्देशांक सेंसेक्स सुरुवातीलाच सुमारे 400 अंकांनी कोसळला.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NSE Nifty) देखील 100 अंकांनी घसरला. अदानी पोर्ट्सपासून रिलायन्सपर्यंत अनेक दिग्गज शेअर्स रेड झोनमध्ये ट्रेड करताना दिसले. ही घसरण गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे.