
आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
सेंसेक्स-निफ्टीसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयासह FII विक्रीने बाजारातील घसरण वाढवली.
Stock Market Closing Today: शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यापाराच्या अखेरच्या क्षणी सेंसेक्स तब्बल 849 अंकांनी कोसळून 80,786 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 255 अंकांनी घसरून 24,712 वर स्थिरावला. बँक निफ्टीत देखील मोठी घसरण झाली आणि तो 688 अंकांनी घसरून 54,450 अंकांवर बंद झाला. चलन बाजारातही दबाव दिसून आला.