
Tata Capital IPO Listing
Sakal
Tata Capital IPO Listing: टाटा समूहाच्या बहुचर्चित टाटा कॅपिटलच्या आयपीओची आज शेअर बाजारात लिस्टिंग झाली. मात्र, या लिस्टिंगमुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. कंपनीचा शेअर बीएसईवर फक्त 1.23% प्रीमियमसह 330 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर केवळ 4 रुपयांचा फायदा झाला.
हा आयपीओ या वर्षातील सर्वात मोठा इश्यू ठरला होता, ज्याचा आकार तब्बल ₹15,512 कोटी रुपये होता. कंपनीने आयपीओसाठी प्राइस बँड ₹310 ते ₹326 ठरवला होता. मात्र, लिस्टिंग पाहता बाजारातील उत्साह थोडा ओसरला आहे.