

-: शिवानी शेळके
Top 10 Mutual Funds Low Return: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. त्याचा परिणाम इक्विटी म्युच्युअल फंड बाजारावरही होत आहे. इक्विटी म्युच्युअल फंडच्या रिटर्नवर गेल्या काही महिन्यांत मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 1 वर्षात अनेक फंडांचा रिटर्न कमी झाला आहे.
जर आपण गेल्या एका वर्षातील रिटर्न पाहिले तर असे किमान 10 इक्विटी फंड आहेत ज्यांचा रिटर्न एफडी सारखा किंवा त्याहूनही कमी झाला आहे. या इक्विटी फंडांनी गेल्या 1 वर्षात केवळ 4 ते 8 टक्के रिटर्न दिला आहे.